संस्थापकिय लेख
संस्थेचे ध्येय उद्देश
व वाटचाल :-
आदिवासी हा मुळचा हया देशाचा मालक असून सुध्दा तो आज खेडयामध्ये मूलभूत गरजेपासून, विकासापासून वंचित दारिद्रयाचे जिवन जगत आहे. विकासाची गंगा त्यांच्यापर्यंत पोहचलीच नाही, आदिवासी विकासाच्या नावांने आज नविन नविन योजना तयार करून त्यावर करोडो रुपये
खर्च केले जात आहे. परंतु आंधळा दळतो व कुत्रा
'पीठ खातो अशी अवस्था हया शासकीय योजनेची झाली आहे. योजना कितीही चांगल्या असल्यातरी ती राबविणारी यंत्रणा कमकुवत निक्रिय, उदासीन व भ्रष्टाचारी असेल तर त्याचा वंचितांना लाभ मिळत नाही - निर्माण झालेल्या आदिवासी समाजाच्या भयानक परिस्थितीला जबाबदार शासन व शासकीय यंत्रणा जबाबदार आहे. त्याही पेक्षा त्या समाजातील पुढारलेला बुध्दीजीवी वर्ग अधिक जबाबदार आहे. जे काही आज आपल्याला मिळाले ती समाजाची देण आहे. हयाचा हया बुध्दीजीवी वर्गाला विसर पडलेला आहे. प्रत्येकाने आपली सामाजिक बांधिलकी जपली असती - समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडले असते तर कदाचित आज आदिवासी समाजाची गणना इतर प्रगत समाजामध्ये झाली असती, असो भुतकाळात घडलेल्या काही चुका त्याची पुर्नवृत्ती होवू नये हयाची दक्षता घेवून आपण आपल्या समाजाचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने नविन मार्ग निर्माण करून एक चांगला भविष्य काळ घडवून आणूया - आपण अनेक आहोत आता एकत्र येण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आपण सर्व एकत्रित होवून प्रभावी शक्ती निर्माण करू शकलो तर निश्चितपणे आपल्या समाजावर होत असलेल्या अन्यायाचा
प्रतिकार करू ते थांबवू शकू अशीच एक संस्था आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता अनेक वर्षापासून समाज हिताचे समाज विकासाचे कार्य करीत आहे. आदिवासी मानव संशोधन व सामाजिक विकास संस्था हया संस्थेने गेले ३० वर्षापासून स्वतंत्र भारतातील आदिवासी व त्यांच्या सामाजिक समस्या हया विषयावर अभ्यास, संशोधन करून समाजाच्या विकासाच्या दृष्टिने संस्थेने (Minimum Manpower & Minimum Finance Budget Tribal Development Master Plan तयार केला असून त्यावर प्रभावीपणे कार्य आहे.) सुरू प्रस्थापित व्यवस्थेमध्ये जर आपल्याला न्याय मिळत नसेल तर पर्यायी व्यवस्था निर्माण करणे हाच पर्याय शिल्लक राहतो. संस्थेचे एकूण २९ सेल्स (विभाग) निर्माण केले असून २९ सेल्स पैकी सध्याच्या घडीला एकूण १३ सेल्स कार्यरत असून संस्था प्रगती पथाकडे यशस्वी रित्या वाटचाल करित आहे. आदिवासी मानव संशोधन व सामाजिक विकास संस्था ही नुसती संस्था नसून आदिवासी समाजाने आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता निर्माण केलेली समाज स्वयंम विकास व्यवस्था आहे. आता व्यवस्थेच्या बळकटी करिता सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला यशस्वी करण्या करिता समाजाच्या प्रत्येक घटकांचे सहभाग व सहकार्य अपेक्षित आहे.
समाजाच्या सहभाग व सहकार्याने विकास जलद गतीने होण्यास मदत होईल. तसेच भारत देशात निर्माण झालेले आदिवासी समाजाचे भयानक चित्र बदलून, सुखी, समृध्द सामर्थ्यवान व स्वाभिमानी समाजाची निर्मितीचे स्वप्न साकार होईल.
Please Help us For Save the Society & Nation
धन्यवाद!
जय सेवा, जय आदिवासी
प्रभुदास पंधरे